ए एन एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक ०६ जुलै २०२५ cover art

ए एन एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक ०६ जुलै २०२५

ए एन एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक ०६ जुलै २०२५

Listen for free

View show details

About this listen

नमस्कार, ए एन एन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागतऐकूया आज दिनांक ०६ जुलै २०२५ चे गुन्हेविषयक बातमीपत्रपिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनावाकडमध्ये अल्पवयीन मुलाचा मित्रावर कात्रीने वार पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राच्या गळ्यावर कात्रीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ जुलै रोजी रात्री दहा वाजता वाकडमधील गणेश मंदिर एकता कॉलनीजवळ ही घटना घडली. जखमी तरुणाच्या मित्राने विचारणा केल्यावर रागाच्या भरात अल्पवयीन आरोपीने सलूनमधून कात्री आणून हा हल्ला केला. वाकड पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.चिखलीत कौटुंबिक वादातून कुटुंबावर हल्ला, चार आरोपींना अटक चिखली येथील रुपीनगर परिसरात कौटुंबिक वादातून एका कुटुंबावर दगड आणि विटांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. ३ जुलै रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या सुमारास रुपीनगर येथील भिगीरथी हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीसह कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून मोबाईलही हिसकावला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, पुढील तपास पोउपनि देवकर करत आहेत.हिंजवडीत ओढ्याच्या प्रवाहाची दिशा बदलून अनधिकृत बांधकाम हिंजवडी परिसरात ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदलून त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, पर्यावरण संरक्षण कायद्याचेही उल्लंघन झाले आहे. ४ जुलै रोजी हिंजवडीतील गट नंबर १५२ आणि २६३ च्या मधील नाल्याजवळ ही घटना उघड झाली. याप्रकरणी जागा मालक आणि विकासकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि वांगणेकर करत आहेत.खालुंब्रे येथे जुगार अड्ड्यावर छापा, दोघांना अटक पुणे जिल्ह्यातील खालुंब्रे येथे एका जुगार अड्ड्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे. ४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता खालुंब्रे गावच्या हद्दीत, भांबोली फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील कमानीजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल...
No reviews yet